भांगरभूंय | प्रतिनिधी
शिवरात्र दोन दिवसावर आयली. से नी आठवण ? लागा तयाऱ्याला. अमना तरी उपास धरणार सा नी ?
बाजाराला जावनी या. गॉड, मूग, कणगा, आणि गहू दळणी हाडा.” खळां सारयता सारयता गोदुकाकीन काकाला आठवण केली. काका आईकनाईक करनी कमराला आकडी बांधनी कुळागरात जायवे सुटलो.
शिवरात्र आयली, खळां सारवनी आज हनार. उध्या सगळा घर सारवे हवा, पर्वा शिवलिंगाची पूजा अणी उपासाची तयारी करे हवी. ते शिवाय सदाची कामा सतच. रांधा वाडा, आयदण भांडी, शेण शिंतिडो. असा बडबडीत ऱ्हेल तर कामा कशी हतील ? सगळा मालाच करे हवा.
कितां म्हणत सलीस मगाशी ? काका आयलो तो पडव्यावर थपकल मारलीन. घोट भरी चहा हाड बघूया. दुपारचे वेळा चाहा कसलो पेंसा ? काकी पदर खोवीत भायेर आयली, रांनी जालां से, पाना थेयली सत, न्हावनी या, देवाचे कपाळावर फुला घाला. हे सगळा सांगेवा लागसे ? नाय देव नाय धर्म ! असा म्हणत काकी घरात गेली. एता चाहा मिळेचो नाय, हे नक्की जालां, तसो काका पाटावर न्हायवे गेलो. मुकाट्यांनी पूजा केली, जेयली आणि आडवो पडलो.
गोदुकाकीन उठले बरोबर म्हशींचा दूध काडलांन. शेण भरला, घर सारवे हवा तितका घरात हाडनी थेयला. काका म्हशींचा घेवनी मळावर जायवे गेलो. काकीन परत आठवण केलींन. लवकर घराशी या. बाजारात चला, आणि शिवरात्रीला उपासाचा समान घेवनी या. जाता जाता काकान सांगोनी सोडला, ‘मेनाय शिवरात्र धरीत”. ता आमला खबर से. तुमी घोतर सोडनी तकल्याला बांधला सा तां. पण आमला करेची से शिवरात्र. उपास धरेचो से. काका आपली शहाणपणा सांगो लागलो. कसली शिवरात्र अणी कसला कितां घेवनी बेसली सय. तू उपास केलेस म्हणी देव पावनार से ? पूजा केलीस म्हणी कितां पुण्य गावणार से ? कितकाय कर शेवटी हायवेचा ताच हनार से. तु देवदेवपण, पूजाअर्चा, उपासतापास, व्रता वैकल्या सगळा करसय, जालो का कितां उपयोग ? जालो का कितां उपयोग. कितकासा बरा केला देवान. यवजलेली कामा जाली का ? माला नाय पटत असल्यो गजाली. माजा काम नियमित करणा होच माजो देव. तुमी करा हवे तेवढे उपास, व्रता अणि सणवार. असा म्हणत काका विडी फुसकाव लागलो .
वाह रे वाह. वालोर तुमला. हेच का ते संस्कार ? हीच का ती शिकवण ? हेच शिकयलासे से का तुमचे जांण्टेनी तुमला ? माजेपुढेत आज बॉयलेत ते बॉयलेत ! भुर्गे समोर असला काय बोलो नाका, अणि असला काय तेना सांगो नाका. माला माजे भुर्गेनां बरी घडवेची सत. तुमी तुमला हवा तसा वागा. हवा ता करा. पण भुरगेवर असले संस्कार करू नाका. काकीन नभ्येता काकाला दबाडगो दिलोन. तुमी समान नाय हाडेचे तर हाडू नाकां. में कितां थोटी नाय. में हाडणार सामान, आमी करनार सो शिवरात्रीचो उपास. में, सुफला अणी शेखर.
तुमला देवधर्म नाका. सोवळा ओवळा काय लागत नाय. मला माज्या आईन सगळा शिकायला से. माजेवर जसे संस्कार जाले सत तशी में वागणार. तू आपली तुमची कामा करा. काकीची शहाणपणा आईकता आईकता चार पाच विडयो फुसकायल्योन. उठलो, पिशवी घेतलींन, नवी पैरण घातली अणी सामान हाडे बाजाराला गेलो.
हेंचे तोंडाला लागोनी उपयोग नाय, माजी कामा एठाच उरनार. आज सगळा घर सारवनी हैवै हवा. बेल काडे हवो. उद्या पाहाटी उठोनी सगळी कामा आटपुनी शिवलीगावर अभिषेक करे महादेवाचे देवळात जायवे हवा. घरा येवनी फळार करे हवो. असा म्हणत काकीन घर सारवे सुरवात केली. घर सारवे शेखरान मदत केली अणी रांधपाचा काम सुफलान केलां. दुपार हसे म्हणीसर सगळी कामा आटोपली. म्हणेपर्यंत काका सामान घेवनी आयलो. सुफला हे सामान न्हेवनी थेय घरात ! आणि आईला सांग, में बी करनार उपास. में न्हावनी येसा, अणी पूजा करसा, मोग जेवया. असा म्हणत काका जावं लागलो. शेखरांन पूजा, नेवेद्य, वैश्वदेव केलोन. तुमी न्हावनी या लवकर. मला भूक लागली से. काका न्हावनी आयलो. आज पहिली खेप सगळी बरोबर जेव्वे बेसली. काकीन दिलेलो दबाडगो उपयोगी आयलो.
काकीचा बोलणा मनाला खुप लागलेला. बाजातथीन घरा येताना काकीचे शब्द कानात घोंगावत सले. में चुकसा हे लक्षात येत सला. रात्रभरी काका विचार करीत उरलो. काकीचे शब्द वर्मी लागलेले. आपण कारोतरी चुकसा हेचि जाणीव हवं लागली. में माजी वागणूक अणी भाषा बदले हवी. एकदा बायलाचे मनाप्रमाण, मताप्रमाण वागोनी बघूया. बोलता बोलता की माजो तोल जासे ? की में माज्या बायलाला तुच्छ लेखसा ? की में त्याला हिडीच पिडीच करसा? की में असो माणुसकीशून्य हसा. विचार करनी करनी तकली गरगरू लागली. आज निर्णय नक्की. एता हेचेपुढा बायलाचे मनाप्रमाण, मताप्रमाण वागेचा. उद्या शिवरात्रीचो मुहूर्त से, उपवास करेचो, विचार करता करता कय नीद लागली अणि कय जागो जालो हे कळलाच नाय.
काका पाहाटी उठलो. न्हावनी नित्यपूजा केली. शिवलीलाअमृत चे सगळे अध्याय वाचले, तेतले कथांनकांचो अर्थ समजोनी घेतलो. मनोभावें पूजा केली, देवाचा स्मरण केला. काकी उठली, बघसे जाले आपण स्वप्नात सा का प्रत्यक्षात सा. हो प्रश्न पडलो. एका रात्रीत घडलेले बदल बगनी देवाला नमस्कार केलो. आज आपण सगळा जग जिंकलेची अनुभूती मिळली. काकान काकीला साद घातलो. गोदु उठलीस ! चल ! तयारी कर. अजूनी उजाडलां नाय. दूध येवनी काढुया. आधी आमी गावातले महादेवाचे देवळात जावया. त्याहां शिवलिंगाची पूजा करूया, दुधाचो अभिषेक करूया! एक एकादशणी करूया. बेल अर्पण करूया. आमचे भुरगेबाळांचा बरा होउदे म्हणी देवाकडा मागोया. हे काकाचे शब्द आयकोनी आपलेला नवजीवन प्राप्त जालेचो भास जालो. हांतरुणावेल्ली ताडकन उठली . काकाबरोबर देवळात गेली. शिवशंकराची आराधना केली. मनोभावे नमस्कार केलो. अणी देवाकडा एकच मागणा मागलांन.
हे शिवशंभू हेना बरेतऱ्हांन वागेची आणि बोलेची बुद्धी दे. आणि तुझी कृपा अशीच हेचेवर सौदे. काकान देवाला हात जोडले. मनोमन एक संकल्प केलो. काकीचा मनोव्रत पूर्णत्वाला न्हेव्वेचां बळ दे.
जय शिवशंकरा । जय भोलानाथ।
अशोक नेने (स्वच्छंदि)
9423811778
खिणाखिणाक ताज्यो घडणुको आनी तुमचे कडेन संबंदीत दरेक खबर मेळयात एका क्लिकाचेर! फेसबूक, ट्विटराचेर आमकां फॉलो करात आनी व्हाट्सएप सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात.