सोवळां – ओवळां

भांगरभूंय | प्रतिनिधी

कोरोनान मांडलेलो उच्छाद परत माला माजे बालपणात घेवनी गेलो. में आजी आजोबा, आई वडिलांचे संस्कारात वाढलो. असे घराणेत वाढलो की जे घराणेत सोवळां आणी ओवळां हेचां कडक पालन केलां जात सलां. त्या वेळा दिसे की कितां ते नियम अणु अटी. आजी तर माला हिटलर सारखी दिसत सली. एक हुकूम शहा. सोवळे संदर्भात तर त्याचे कडक नियम सत सले. खायवे जेव्वे आयलो की पयलो प्रश्न सैवेचो, ” हात धवलेस का ? होय म्हटलां तरी, रिठे लावनी धवलेस का ? दुसरो प्रश्न. हात धवलेची हमी दिले शिवाय खायवे जेव्वे देत नसे. इतकांच न्हुय तर केंनथीन ही बाहेरथीन आयलो तर हात पाय धवले शिवाय घरात घेत नसे. अणी बाजारातथीन आयलेवर सरळ पाटाकडा धाडी. आंगावेल्ले कपडे भिजत घालनी न्हावनी करनीच घरात येव्वेची रीत घालनी थेयलेली सली. प्रत्येक आयदण प्रत्येक वेळा धवनीच वापरीत सली. रांधप करताना तर शंभर वेळा हात धवीत सली. उष्टां खरकटां हो तर विषय खुपच मोठो से. आजकाल प्रेसटीज म्हणी हॉटेलात बायलाचां उष्टां खाल्लां जासे. एकामेकांचां उष्टां खाणां हे जीवाला अपाय कारक से, ही आजीचीच शिकवण सली. कुळागरातथीन हाडलेला पेर घर हाडनी खाताना आजी बारकायान लक्ष थेवनी सत सली. में अणी माई पेर खायवे झगडत सलों. पेर अर्धा अर्धा करनी खायवेचां सत सलां. माईन चावोनी अर्धा केला, अणी माला दिला. उश्टा पेर माला आजीन खायवे दिला नाय.
कितक्यो तरी आरोग्य विषयक गोष्टी आजीन आमला शिकयल्यो हल्यो. जुतां घरा बाहेर काढणां. दिवसातथीन दोनदा तरी जुतां धुणां. हातपाय धवले शिवाय घरात जायवेचां नाय. हात धवले शिवाय जेव्वेचां खायवेचां नाय. सदाचा टॉवेल धव्वेचो. भायेरचे कपडे भायेरले भखयेरच भिजवनी घरात येवप. केंचाय ही फळ धवले शिवाय खायवेचां नाय. सुतक अणी सूयेर पाळप. न्हावनी धवलेले कपडे घालप. एकदा आंगावरथीन उतरलेलां वस्त्र परत परिधान करेचां नाय. दुसरेचे कपडे वापरेचे नाय. प्रत्येकाचो शाबू, टॉवेल अणी हांथरूण वेगवेगळिं सैवां. शिवाय दोन तीन म्हयनेंचां किरणी सामान एकदाच हाडनी घेत सली. तिं सगळां धोवनी सुकवनी डबे भरनु थेव्वेची पध्दत सली. भायेरथीन हाडलेली प्रत्येक वस्तू मोग ती खायवेची सो किंवा वापरेची सो. धवले शिवाय घरात हाडेची परवानगीच नतली. अश्यो खूपश्यो गोष्टी आजीन संस्कारित केल्यो सल्यो. म्हणी आज आमचां कुटुंब निरोगी से.
आज काल नवीन विकत घेतले कपडे, अणी शिवोनी घेतलेले कपडे आपण जसेच्या तसे वापरसो. शिंप्याकडा तर शिवे घातलेले कपडे कितके दिवस अणी केंच्या खाचित धूळ खात पडलेले ससत देव जाणे. पण आपण नवीन कोरे कपडे धवले शिवाय वापरसो. भायेरचो सगळो व्हायरस आंगावर घेवनी मिरयसो. हाल्ली तर do not wash चां लेबलच ससे. डोंबलाच तेंचां do not wash.
बायलां, पैठणी, सिल्क, रेशमी, बनारस शालू अशी नावां सांगत चार वेळा तरी नेससत. म्हणे रोज साडी धव्वेची नससे. आज काल तर बायलांच्यो साड्यो अदला बदली चालूच ससे. एका काळांत लग्न अणी इतर समारंभाना दुसरेंचे कपडे वापरीय सले. वेषभूषेच्या स्पर्धाला भाडेचे वेष वापरले जाहत. हे ड्रेस कितके लोकांनी वापरलेले ससत, अणी दर वेळा तर धवीत नाय. स्थानिक स्थरावर उमेदी नाट्य कलाकारांची ऐतिहासिक नाटकाची तर हीच हकीगत. न्हाव्याकडे तर तीच कथा. हजामतीला गेलेलेला तर एकच कपडो वापरसत. केश कर्तनालय कितकांही आधुनिक सो. पांघरणेचो कपडो सगळें साठी एकच ससे. तो कितके दिवसांनी धवसय तां ते न्हाव्यानाच खबर. पण खरां सोवळां बघेचां असयेल तर डॉक्टर लोक. ल्हान पणांत बघितलेली अणी यवजलेली एक गजाल. घरात कोण आजारी सयेल. डॉक्टर तपासायला येवेचे सत, तर आदी गरम पाणी अणी शाबू टॉवेलची तयारी पयली हत सली’. हेचां कारण एत्ता लक्षात येसे. ऑपरेशन थिएटर ही सगळेत सोवळां पालन करणारी खास जागा असां म्हणेला काडी मात्र शंका नाय. जसां ऑपरेशन थेटर मध्यां सोवळां ससे अगदी तसांच सोवळां आमचे घरात, आजीचे ओबझर्वेशन खालती सत सलां. आजी चे संस्कार आजोबावर पण झाले सैवेत.
आबांचां सोवळां तर अधिकच कडक सलां. कुत्रो घडलो तर सुद्धा ते न्हावनी येत. कुत्रो सोडाच ते केंचेच माणसाला सुद्धा घडत नसत. प्रातविधी साठी एक कोस दूर जात सले. लघवी चे नियम तर मुंजीत सांगितले प्रमाण पाळीत. जेयताना आवथी घातले शिवाय जेवीत नतले. पानाभोवती पाणी फिरवनी मंत्र म्हणणे पाठलां विज्ञान सेहे जाणंत सले. केंचोही बाहेरच़ जीव अन्नात येव्वेचो नाय. आयलोच तर पानाच्या कडाचां अन्न तो खायेल. अणी आपण व्हायरस मुक्त ऊरनार अशी प्रथा सली. न्हावनी आयले शिवाय जेवण कोणाचेच नशिबात नतलां. आजारी माणसाला तर स्वयंपाक घरात एंट्रीच सत नतली. घराची रचना ही तशीच सली. बाळंतिणीची खोली पण वेगळी सली. आजारी माणसा साठी खोली वेगळी सली. कोठेची खोली वेगळी. बैठकीचां साल वेगळां. सांड पाण्याचो प्रश्नच नतलो. आयदणभांडी, कपडे सगळांच पाटावर धवीत. आजारी माणसा साठी खोली वेगळी सली. बाहेरचे व्यक्तीला पडव्यात प्रवेश नयलो. बाहेरची भांडी वेगळी, घरातली भांडी वेगवेगळी सली कारण फक्त एकच सलां बाहेरलो व्हायरस घरात येंव नये. पण इतर लोक तेचो अर्थ वेगळोच लावीत. एठा अस्पृश्यताचो प्रश्नच नतलो. हेतू सलो तो एकच आरोग्यम धनसंपदाम। कुटुंबाचं आरोग्य निरोगी ऊरेवां. आरोग्यम धनसंपदान चां काटेकोरपणे पालन घरात हत सलां. अणी तेच संस्कार आमचेवर हत गेले. म्हणी आमचे घराणेत डॉक्टर हो विषय खबरच नाय.
घरातथीन आजी कडल्या मिळालेले संस्कार आज कामी येत सत. स्वच्छता, सोवळां, ओवळिं, हे आरोग्यदायी से हे आमला कळलां. जगाला आज कळो लागलां से. वळे वेळ लागेल. पण कळेल हे नक्की.

अशोक नेने (स्वच्छंदि)
9423811778