आमची चतुर्थी आमची उमेदकालची अानी आयची…..

भांगरभूंय | प्रतिनिधी

गणेश चतुर्थीचो सण सर्वसाधारण सगळेच घरानी साजरो करसत . प्रत्येक जण हो सण मनोभावे, मन लावनी करसत. कोण दीड दिवस तर कोण पांच दिवस गणपती थेयसत. तर कोण सात दिवस तर कोण अकरा दिवस. एकवीस दिवस गणपती थेयणारे क्वचितच ससत. हे दिवस कसे. कोणी, अणि किताला ठरयले ता देव जाणे. हे शास्त्र आयला केंथिन ता विचार करणे सारखा से. ता किताही सो. लोक चतुर्थी साजरी करसत आणि आपले मनाचा समाधान करनी घेसत.
आजचे चतुर्थीचा चित्र बघलेवर मन सहज जुने काळात प्रवेश केले शिवाय ऱ्हेत नाय जालां. आज ची बाजारातली गजबज, धागड धिंगाडो, फोग (फटाके) वाहांनाची रेलचेल, कर्कश आवाज, कर्णविधुर संगीत, आधुनिक वस्तूंचो भरणो, आधुनिक सजावट ह्यो सगळ्यो घडणुकी बघितल्यो कि नक्कीच मन खुपसे वर्षा पाठली चतुर्थी बघणेत गुंग हसे.
खराच में इतको गुंग जालो कि, ते दिवस माज्या नजरा समोर चित्रा सारखे सरको लागले. माला आजही आठवण हसे. आमी धावेत पांडुरंग काकात्या गणपतीची मूर्ती हाडे जात सले. लक्ष्मण ताते बरोबर धावेत जायवेची हौस जास्त. गणपतीच्या मूर्तीशी देणां घेणां काहीच सत नतला. फक्त मजा म्हणी जायवेचां, पण काकां केलेली मूर्ती आजही डोळे समोर उभी ऱ्हेसे. अगदी लहान , रेखीव अणि आकर्षक. मूर्ती लहान इतकेच साठी, कि ती मूर्ती घेवनी तास भरी चालत जायवा लागत सला . तसाच विसर्जनाच्या वेळा कुळागरातथिंन, पायडीतथींन, अडचणीच्या वाटांन नयवर जायवा लागे. हि अडचण लक्षात घेवनी मूर्ती कार मूर्ती करीत सलो. आज वहानांची सोय से. घरापर्यंत वाहान जासे . बदल हो घडत जानार. म्हणीच बदलेले हे जमानेत जुन्यो आठवणी येणारच.
एक वेळ अशी सली कि चातुर्थी म्हणजे सामसुम. थंड वातावरणात पार पडत सली. बोवाळा पेक्षा भक्ती जास्त. दिखावे पेक्षका समाधान जास्त. तन्मयता सली तितकीच आत्मीयता सली. मारांदे (फटाके ) नाय. डीजे नाय. स्पीकर नाय . सोयरेत्यां जाणायेणा नाय. आपलो आपण आणि शेजारी. कारण वहातुकीची सोय नतली. आजचे इतकी आधुनिकता नतली. म्हणी घेणारे घेसत हो सण साजरो करीत तेतथिन जा समाधान गावे तां निराळाच सलां. पूजाअर्चा, नेवेद्य, आरती धुपार्ती, गणपती अथर्वशीर्षाची आवर्तन असे विधी मनसोक्त करीत सले. सोवळा ओवळा कडक पाळीत सले. ना लाईट ना झगमगाट. अगदी शांत वातावरणात चतुर्थी साजरी करीत सले.
श्रावण म्हयनो सोप्लो कि चतुर्थीच्या तयाऱ्याला सुरवात हत सली. घराची झाडलोट, साफसफाई, घर निस्तारणा हि प्रमुख कामा सत सली . भिंतीना रेवो काढनी, जमिनी शेणांन सारवनी खरे अर्थान तयाऱ्याला सुरवात हत सली. देवाची भांडी समयी, निरांजना , पंचारत, धुपाटणा, तांबीटी, पेलो, आचमनाची पळी, गंधाची सांण, पाट अश्यो वस्तू धुवुनी पुसनी साफ करीत. सुका खोबरा किसनी पुरणाची तयारी चार दिवस आधीच हत सली. नेवऱ्यो, मोदक पण आदले दिवसा तयार सत सले. उकडीचे मोदक चतुर्थी दिवसा सोवळेनीच करीत. पण तांदूळाचा पीठ जातेवर दळणी मोदकांची पूर्व तयारी आदले दोन दिवस करीत सली. नेवेद्याला उकडीचे मोदक घरात करीत सले. घरात फुलयलेल्या ल्हायांचो नेवेद्य दाखवीत. घरात दळलेले तांदळाचे पिठाच्यो नेवाऱ्यो सुद्धा उकडीच्योच करीत. उकडीचे मोदक, उकडीच्यो नेवऱ्यो, भाताच्या ल्हायांची पंचखाद्य, तांदुळाची खीर हे गोड पदार्थ नेवेद्याला सत सले. गणपतीची उत्तरपूजा आंबोऱ्या पैली गणपती विसर्जन करेची परंपरा सली. कारण इतकाच कि नयवर जायवे वाट अडचणीची. लाईटीची सोय नतली. जुने काळा पाष्णि हि परंपरा आज खेडे गावनी जिवंत से. तरीही आज काल बाहेरचा वारा व्हावे सुरवात जाली से.
पण आज मात्र परतीचा वारां व्हावेसे कसा दिस्से. जग बदलला से. लोक बदलले सत. रूढी, रीती, परंपरा, सण, उत्सव, सगळाच बदलला से. हेत गैर असा काहीच नाय. पाटावेल्लो गणपती टेबलावर पावलो. टेबला वेल्लो गणपती मकरात बेसलो से. मकरातले गणपतीला थर्माकोल आणि प्लास्टिकांन आपलोसो केलो से जमिनीवरची फळावळ गणपतीचे माथेवर पावली से. कारण इतकाच की माणूस आपली सोय बघसे. आपल्या अडचणींचा निवारण करीत से. म्हणी हे बदल घडत सत.
पण ते काळातली चतुर्थी अणि हे वेळा वेल्लि चतुर्थी हेत खूप बदल जालो से. समाधान दोनातय से. कारण समाधान मानणेत से. आजकाल जितके मोठे पोजिसावात चतुर्थी करसत तितका समाधान जास्त असा चित्र दिस्से. चातुर्थीतला वातावरण बदलला से. फोगाचो ( फटाक्यांचा ) आवाज, अणि केर कचरो, दारूची घाण, आवाजाचा, वारेचा प्रदूषण आणि तेतथींन उदभवणारे रोग, आजार जाले तरी माणूस समाधानी दिस्से. सुखी दिस्से. आनंदित दिस्से. आपले मोठेपणासाठी शेजाऱ्या पेक्षा जास्त वरचढ हत जास्त खर्च करप. जास्त फोग ( फटाके )लावप. लाईटीची आरास करप. तरातऱ्हाचे बाजारी खाद्य पदार्थ, कानठळ्यो बेसतील असे संगीताचे आवाज, नवनवीन कपडे खरेदी, एखादी गाडी खरेदी असे अनेक तराचे अवाढव्य खर्च करनी चतुर्थी साजरी करसत. अणि तेतच आपला मोठेपण सिद्ध करेचो यत्न करसत. खरा म्हणजे भक्ती करनी समाधान मिळवणे साठी एवढो खर्च करेची गरजच नाय. मनोभावे केलेली सेवा अणि भक्ती हेतच खरां समाधान से हे माणूस विसरत चाललो से.
खरा सुख अणि समाधान कितेत से ? वायफळ पैसो खर्च करनी खराच समाधान मिळसे का? देवा साठी वायफळ खर्च करनी देव पावसे का ? जास्त खर्च केलेवर जास्त पुण्य लाभसे का ? नाय असाच उत्तर सैवा. जितकी मनापाष्णी सेवा तितका समाधान. जितकी मनापाष्णी भक्ती तितकाच पुण्य. मोग कि इतको पैसो खर्च करे हवो ? ते पेक्षा ती रक्कम गरीब आणि गरजू विध्यार्थ्याना देव्वी. तेच बरोबर दुसरेचे भले साठी वापरेवी.
गेले पस्तितस वर्षापाश्णी में चतुर्थीला नैसर्गीक सजावट करीत सां. फटाके पण न लायता चतुर्थी साजरी करसां. सजावट अणी फटाकेसाठीचो खर्च माज्या ज्ञानसागर विद्या मंदीर अणी बाल मंदिर धावे तार, सत्तरी, या शाळातले गरजू विद्यार्थ्यांना मदत करसां. यंदा विविध स्पर्धांची बक्षिसां पुस्तक रुपांत देव्वे ची ठरयली सत.
आजकाल सार्वजनिक गणेशोत्सवाची चलती से . जो तो असे मंडळाना देणग्यो देसत. ऑर्केस्ट्रा, नाटकां सारखे करमणुकीचे कार्यक्रम स्पॉन्सर करसत. आणि स्वताचा समाधान करनी घेसत. असा करनी आज गणेशोत्सव मंडळा कडा अफाट पैसो से आणि अफाट खर्च पण करसत. तेंचेय हो खर्च शिक्षण क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात खर्च केलेवर खरा समाधान सयेल. आणि दान केलेला पुण्य लाभेल.
सार्वजनिक गणेशोत्सवाचो मूळ हेतू आज लोक विसरत चालले सत. माणूस पैसो आणि मोठेपणात गुंतलो से. खरो बदल एठा हयवेची गरज से. एक धार्मिक सण साजरो करता करता तो सार्वजनिक झालो. सगळेची जमा बाकी केली तर, प्रत्येक जण चतुर्थी साजरी करसत कारण ती एक उमेद ससे. चातुठी हो सण वर्षातठीं एकदाच येसे. प्रत्येकाची इष्ट देवता. तेचा स्थान प्रथम. हो चतुर्थीचो सण साजरो करे एक वेगळीच उमेद ससे. म्हणी प्रत्येक जण जीव आणि पैसो ओतनी हो सण साजरो करसत. कारण आमची चतुर्थी
आमची उमेद. मोग ती कालची सो अथवा उद्याची.

अशोक नेने
75884 43441