भांगरभूंय | प्रतिनिधी
डायरी, दैनंदीनी, रोजनिशी ऐवजी में तर संकल्पच म्हणेन. डायरी लिहिणां म्हणजे उध्याचा किंवा पुढले कामाच्यो आठवणी नोंद करनी थेयणां. आज आपण कितां कितां केलां तां नोंद करणां म्हणजे रोजनिशी.
खरां म्हणजे में ल्हानपणापाश्णी सद्दानी रोजनिशी लिहे शिकलो. अगदी दुसरीचे वर्गात सताना. माजे वर्ग शिक्षक कुलकर्णी हे माझे गुरुजी सले. तेंचेमुळां में रोजनिशी लिहे शिकलो. सद्दानी रोजनिशी लिहूनी हाडेची ही तेंचेनी आमला शिस्तच लायली सली. अणी ती आज पर्यन्त अंगवळणी पडलेली से. फक्त ईतकांच न्हूय ते सगळां संस्कारित शिक्षण माला तेंचे कडल्याच मिळलां. ते पुस्तकी अभ्यासा बरोबर खूप कितां वेगळां शिकवीत सले. पर्वचा म्हणणां, वडील धाऱेंचो आदर करणां, शिस्तबद्धता, टापटीप, वक्तशीरपणा. असे अनेक तऱ्हाचां सचसंस्कारित शिक्षण में तेचे कडल्या घेतलां. माजेतलो वक्तशीर पणा, हजरजबाबी पणा, प्रामाणिक पणा हो तेंचेनी दिलेली माला कायमचा ठेव से. शिवाय श्लोक , प्रातःस्मरण नित्यपूजा, हे पण में कुलकर्णी गुरुजी कडल्या शिकलो. आरोग्य निरोगी थेयणेसाठी व्यायाम करेची ओढ तेचेनीच लायली. म्हणी ते माजेसाठी आदरणीय सले अणी सत. पालकापेक्षा ते माला प्रिय सले अणि सत. कारण आज में जो सां तो तेंचेचमुळां सां. गुरुजी विषयी लिहिला तर एक पुस्तक जन्माला येल. माजे पुस्तकात में तेंचे विषयी खूप लिहिलां से. चला तर एतां विषया कडे वळोया.
सुरवातीला रोजनिशी म्हणजे कितां लिहेचां हो मोठो प्रश्न ! उठलो, जेलोलो, अभ्यास केलो, अणी नीदवलो. सोपली रोजनिशी. जसो में वयान अणी ज्ञानान वाढत गेलो तस तसो में रोज रोजनिशी म्हणजेच दैनंदीनी न लिहिता, संकल्प लिहेला सुरू केले. मनोमन ठरवे सुरू केलां. फक्त ठरवे, लिहेला न्हुय तर पार पाडे पण सुरू केलां.
सद्दानी रात्री निलवेचे आधी उध्याचां काम, अणी ते कामाचां वेळापत्रक तयार करे सुरू केलां. तेलाच मे डायरी, दैनंदिनी ऐवजी दर दिवसाचो संकल्प म्हणेन. में जो संकल्प करसां तो मे पुर्ण करसां. मोग तेला कितकेही कष्ट पडोदत, वेळ कितकोही लागोदे, खर्च कितकोही येंवदे, कोणाचेही हातापाया पडेवां लागोदे, में माजो संकल्प पूर्ण केले शिवाय सोडीत नाय. सबंध आयुष्यात आजपर्यंत में जे संकल्प केले ते पूर्ण केले शिवाय सोडले नाय. हार कईच मानली नाय. अशी एकही गजाल नाय की जी में अर्धवट सोडली. प्रयत्नांची पराकाष्ठा करसां. पण मनात हाडलेला काम अर्धवट सोडीत नाय. अणि तां पण ठरयलेले वेळात. आज माजो एकच संकल्प अर्धवट से. पण तो परावलंबी से. म्हणी तो गेली पाच वर्षा अर्धवट ऊरलो से. पण आशा से की, तो पण में पूर्ण करीन. असा दिस्से की, में विषय सोडनी बोलो लागलो. बरां तर परत एकदा विषयाकडा वळसां.
दैनंदिन अणी वार्षिक संकल्प असे दोन विभाग करनीही बोलता येल. जे परावलंबीत संकल्प अणी मोठे संकल्प ससत. ते पूर्ण करणेसाठी आपलेकडा बरे गुण सैय्वे लागसत. तसांच वाणी पण गोड अणी दुसरेला मोहित करणारी सैवी लागसे. अशी कारण मीमांसा करनी असे मोठे संकल्प पार करेवे लागसत. हेसाठी परोपकारी व्यक्तिमत्व, अणी प्रामाणिकपणाची गरज ससे. संकल्प अपूर्ण उरणेतली कारणां अणी अडचणींचो अभ्यास करनीच में असे संकल्प पूर्णत्वास नेत ससां. रखडलेले संकल्प पण पूर्ण हतील अशी मनोमन खात्री से. विषय सोडनी दूर पाव्वेचे आधी में विषयाला चिकटोनीच पुढली काणी सुरू करसां.
डायरी लिहिणां ही थोडीशी आधुनिक बाजू से. मोठमोठे व्यापारी, अधिकारी, राजकारणी व्यक्ती, अणी एपॉइंटमेंट घेवनी कामा करणारे असे खुपसे लोक अशी डायरी लिहिसत. अशी डायरी लिहिणारे अणी तेप्रमाण काम पूर्ण करणारे अवघेच ससत. पण अशी डायरी लिहुनी काम करणारेत एक प्रकारची शिस्त बाणावसे. अणी ती व्यक्ती प्रामाणिक म्हणी नावारूपाला येसे. अश्या व्यक्ती मध्यां वक्तशीरपणाची लक्षणां दिसो लागसत.
अशी डायरी maintain करेची माजी एक वेगळीच पद्दत से. में एक प्रवास डायरी लिहेची शिस्त थेयली से. खूप वर्खापाश्णीची माजी एक प्रवास डायरी से. में ज्या ज्या व्यक्तीला मिळसां, तेंचो तपशील में तेत लिहुनी थेय्सां. मिळलेली वेळ, तारीख अणी साल हे लिहीसांच. शिवाय चर्चा केलेले विषयही लिहूनी थेयसां. ते शिवाय तेचां नाव, गाव, पत्तो पण नमूद करसां. आज माजेकडा शेकडो व्यक्तींचे तपशील सत. हेचो उपयोग खूपदा, खुपश्या तऱ्हांन हसे. किंवा आपले पणा उरसे. तसांच कयतरी तेच गावात जर पावलो. तर काही खूण गाठी सांगता येसत. शिवाय जवळीकही वाढसे. अणी आरंभलेले संकल्प तडीला न्हेव्वे मदत हसे. आपुलकी वाढसे अणी नवीन ओळखी पण वाढसत.
अशी ही दैनंदीनी, रोजनिशी अणी डायरी लिहिणेचां बळ माजेत बळावलां, असे सुसंस्कार माजेवर घडले, मला सुसंस्कारित, वक्तशीर अणी प्रामाणिक घडवणारे ते कुलकर्णी गुरुजींना माजां दण्डवत.
अशोक नेने (स्वच्छंदि)
9423811778
खिणाखिणाक ताज्यो घडणुको आनी तुमचे कडेन संबंदीत दरेक खबर मेळयात एका क्लिकाचेर! फेसबूक, ट्विटराचेर आमकां फॉलो करात आनी व्हाट्सएप सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात.