भांगरभूंय | प्रतिनिधी
हेंच तां जनेल. अगदी आठवणीतलां. जुने घराचां अगदी ल्हानसां लाकडी जनेल. ल्हान ल्हान लाकडी पट्यांचां. खरां तर हे आजीचा जनेल. आजीचे अंतर्मनाचां जनेल. हें जनेल म्हणजे मायाचो सागर. रांधपाचे सालातले जनेलाचो उपयोग आजी साठीच हत सलो. कोण आयलो गेलो हे सगळांच एठाथीन दिसत सलां. भाकऱ्यो भाजेला बेसो दे नाय जाले जेव्वेला. ह्या जनेलातथीनच सगळांच दिसे. गोरावांचो गोठो, गोरवां वासरां, सगळां बेसल्या जागेवेल्या दिसे. रांदपाचे सालातली ल्हानसां जनेल, पण माजे मनात मोठां घर करनी ऱ्हेलेली. आजही तां जनेल बघितलां की तो प्रसंग डोळेसमोर उभो ऱ्हेसे. आज में जो चालसां फिरसां तो फक्त आजीच्या त्यावेळच्या समय सुचकते मुळान. त्या वेळा आजीन प्रसंगावधान जाणलांआणी माझी सुटका केली.
आजी स्वयंपाक घरात भाकऱ्यो भाजीत सली. में वाट बघीत सलो. कय खायवे वाढणार हेची वाट बघीत सलो. में सहा सात वर्साचो सयेन. ते वयात क्ये थार सलो. क्यें जमिनीला पाय टेकत सले एका जागेवर. चुलीच्या आजूबाजूला खेळत ऱ्हेव्वेचां. मोग आजी ताट पाट करे शिकवी. पेले तांब्ये भरनी घेंश लावी. हे सगळां जालां तरी भुकेले पोटाला वाट बघेवीच लागे. पण माजां मन खेळ खेळणेत दंग सत सलां. तितकेत कोण तरी आयलो. बघसां तर कामाला मानाय येत सले. तेना बघेवे म्हणी जनेलात चढलो. तेना हात दाखंव लागलो. ते सरळ कुळागरात गेले. में मात्र जनेलात उकिंडो बेसोनी ते दिसतील ह्य आशान एका कोपरेतथींन बागवोनी बघीत सलो. तितकेत माजी धोपरां लाकडी खांबे मधल्या फटीत अडकली. भायेर काढता येत नाय जाली. में रडो लागलेवर आजीचे लक्षात आयलां. आजी काम सोडनी आयली अणि माला खेचनी बघितलांन. तेडला मात्र माझे पाय अर्धेवर तुटले गत दिसलां. मोठ्यान करंदाय मारली. आजी भयभीत जाली. माजे प्रयत्न में करुतच सलों. रडत सलो. कावरो बावरो जालो सलों. आजीला पण घाम सुटलो. घराशी अणि कोणच नतलो. माजी आरड आयकोनी कामावेल्ले मानार धावत आयले. अणी ते प्रयत्न करू लागले. ते जितके प्रयत्न करनी बघीत तितक्यो वेदना माला हत हत सल्यो. कोणी म्हणे जनेलाचे खांबे खरवत्यान कापूया , तर कोणी म्हणे ओढनी काढूया, तर कोणी म्हणे मेस्ताला हाडुया. पण आजीन प्रसंगावधान राखलां. कोणालाही काही करू दिलां नाय. भायेरल्या वाटान जावनी आजीन प्रयत्न करनी बघितले. पण व्यर्थ. आजीला पण रडे आयलां. कितां करेवां तां सुचत नायसां जालां झालं. आजीला एक युक्ती सुचली. रोकडीच ती पडव्यावर गेली. खोबरेल तेलाची तांबुली घेवनी आयली. माजे धोफरांना भरपूर तेल लायलां. जनेलाचे लाकडी खांबेना पण लायलांन. माजी धोपरां पाठी पुढां करीत हळु हळू खेचीत माजी धोपरां भायेर काडली. तेडला में एकच श्वास सोडलो. धोपरांना मुको मार लागलो सलौ . उभां ऱ्हेता येत नतलां. आजीन माला उखलूनी अंथरुणावर थेयलो. पायेना बरां तेल रगडलां. इतकां हय पर्यंत भूक गेली अणि निज लागली.
जागो जालो तेडला आजी पायेना तेलरगडीत बेसली सली. आजी शिकली नतली तरी त्याला प्राथमिक उपचार खबर सले. दोतोराकडा न्हेव्वेचो तर पांच कोस दूर चालत जायवां लागे. आजीचे उपचार गुणकारी ठरले. दोन तीन दिवसानी चाले फिरे येंव लागलां.
खरांच मे चालतो फिरतो जालो तो आजीच्या समय सुचकते मुळां. पुढां जीवनात अशी असंख्य जनेलां आयली नी गेली. स्मरणात ऱ्हेली ती एक रांदपाचे सालातलां जनेल. बाकीची जनेलां आयली ती चढाओढ करणेसाठी.
मूळ घरा आजी अणी दादा (वडिल) ऱ्हेत. अणीआई बरोबर आमी भुर्गी शिक्षणासाठी डिचोल्या ऱ्हेत सलो. सुट्टी सुरू जाली की मूळ घरा कट्टऱ्या येत सलों. येव्वे जाय्वे एकमेव एक बस सली ती म्हणजे नंदिनी. येताना परत तीच चढाओढ. जनेलाकडा जागो मिळवेची. बस भरोनी सताना जनेलाकडलां सीट मिळेल का ? तां कसां मिळवेचां ? हेसाठीच प्रयत्न जास्त सत. त्या कामात माई हुशार सय्वेची. सदाच माईची सोबत सैवेची. जनेल मिळवणेत हुशारच सैय्वेची. माईचेकडाला बेसोनी जनेला कडाच बेसलेचां समाधान करनी घेव्वेचां. मोग ठराव हत सले. ठराविक अंतरान सीट बदलेचा. सुट्टी सोपवनी परत जाताना बस आमचे गावातथीन सुटणारी सले कारणान जनेलाची सीट दोघांनाही मिळत सली. तेडला मात्र आठवण हत सली ते गाणेची. झुक झुक आगीन गाडी. बसीतथीन जात सलो तरी झुक झुक गाडी यवजत सली. तोच आनंद मिषयलेचां समाधान हत सलां
जुने घराला जनेलां ल्हान सैवेची. आजकाल तर मोठमोठी जनेलां ससत. पण उद्देश एकच. बाहेरचां जग बघेचां. कोणी निसर्ग बघसे तर कोणी अणि कितां. आपलेला शुद्ध हवा अणी उजेड देणारां जनेल हेचो विसर पडलेलोच ससे.
तशी जनेलां खूपच ससत. पण आठवणीतली दोन जनेलां. एक अंतरमानाचां अणी दुसरां बाह्य मनाचां. तेत महत्वाचां म्हणजे आपले मनाचां जनेल. हे जनेल अत्यन्त नाजूक ससे. तेतथीन बघणारेला तुमचे स्वभाव गुण जाणवसत. सगळां कसां स्पस्ट दिस्से. अंतर्मनातले भाव दिससत. म्हणी ते जनेलातथीन बघणारो कईच फसो शकत नाही . हेच जनेलातथीन समोरचेला आपले स्वभावचां दर्शन घडसे अणि माणसां जुळत जासत. नाती जुळत जासत .असली जनेलां इतकी स्वच्छ सैवी की तेत पारदर्शकता सैवी. असे जनेलांना जर भितरथीतन पडदो सयेल तर माणसां जोडणेपेक्षा तुटणेचोच संभव जास्त ससे. घराचे जनेलातथीन वारो येसे तसोच मनाचे जनेलातथीन प्रेमरूपी वारेची झुळूक येसे. उजेड येसे तसोच मनाचे जनेलातथीन स्वभाव रुपी उजेड भायेर पडत ससे. मनाचां जनेल असां उघडां थेव्वां की त्यांहा माया, ममता जास्त येव्वी. माणसां जोडीत जाय्वी. नाती जुळत जाय्वी. हेच मनाचे जनेलातथीन प्रेम ओसंडत व्हावेवां. अणि समोरचां जग आनंदीत दिसेवां. अशी ही अंतर्मनाची अणि बाह्य मनाची दोन जनेलां माजे समरणातली जनेलां.
अशोक नेने (स्वच्छंदि)
9423811778
खिणाखिणाक ताज्यो घडणुको आनी तुमचे कडेन संबंदीत दरेक खबर मेळयात एका क्लिकाचेर! फेसबूक, ट्विटराचेर आमकां फॉलो करात आनी व्हाट्सएप सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात.