चवथी निमतान आरती

भांगरभूंय | प्रतिनिधी

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची |
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची |
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ ||
रत्नखचित फार तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरेजडीत मुगुट शोभती बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ ||
लंबोदर पितांबर फणीवरबंधना |
सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना |
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ ||
……………………………….

श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा | वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा | लावण्यसुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || १ || जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ ||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा | विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || २ ||
देवी दैत्यी सागर मंथन पै केले | त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले | तें त्वां असुरपणे प्राशन केलें | नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ३ ||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी | शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ४ ||
…………………………………

श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी | वारी वारी जन्ममरणाते वारी | हरी पडलो आता संकट निवारी || १ ||
जय देवी जय देवी महिषसूरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी || धृ ||
त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही | साही विवाद करिता पडिले प्रवाही | तें तू भक्तालागी पावसी लवलाही || जय || २ ||
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा | क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाशा, अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा |
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक || ३ ||
…………………………………

येई हो विठ्ठले आरती

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ।।

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे…
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। १ ।।

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि…
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। २ ।।

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ३ ।।

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।येई हो विठ्ठले माझे माउली ये ।। ४ ।।
……………………………………..


मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी || कडाडिले ब्रह्मांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ || जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ || दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद | कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||
………………………………


प्रार्थना

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।1।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।2।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे,
नारायणायेति समर्पयामि ।।3।।

अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।4।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।


सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेचि आतां

कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी

मोरया मोरया मी बाळ तान्हें
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

ज्या ज्या ठिकांणी मन जाई माझे
त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही


जय गणेश

जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
तूं गणपती, मंगलमुर्ती
तूं भुपती, म्हागणपती
तूं गजानन, विश्वराज नंदन
तूं शुभम, मुशकवाहन

जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
तूं गजकर्ण, सिद्धीविनायक
तूं लंबकर्ण, प्रथमेश्वर
तूं लंबोधर, उमापुत्र
तूं गदाधर, देवव्रत

जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
तूं भालचंद्र, बुद्धीनाथ
तूं वक्रतुंड, गणाध्यक्ष
तूं एकदंत, विघ्नहर
तूं अमित, चर्तुभुज
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
तूं कपील, पितांबर
तूं कवीश, कृपाकर
तूं हेरंब, अवनीश
तूं महेश्वर, सुरेश्वरम
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश
जय गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश

पुष्पा नायक
मिरामार पणजी
……………………………..

मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।

गणपतिबाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया..

सगल्यांक चवथीचीं परबीं.